Ad will apear here
Next
रत्नागिरी नगर वाचनालयात दिवाळी अंक प्रदर्शन
प्रातिनिधिक फोटोरत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन सुरू झाले आहे. वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते नुकतेच प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी कार्यवाह आनंद पाटणकर, मालती खवळे यांच्यासह मान्यवर आणि सभासद उपस्थित होते.

या दिवाळी अंक प्रदर्शनात सध्या ७० दिवाळी अंक उपलब्ध असून, अजून काही अंक उपलब्ध होणार आहेत. उपलब्ध अंकांमध्ये आवाज, माहेर, मेनका, तरुण भारत, साप्ताहिक कोकण मीडिया, सकाळ साप्ताहिक, सकाळ शब्ददीप, दीपस्तंभ, अंतर्नाद, नवल, जत्रा, तनिष्का आदी अंकांचा समावेश आहे. दिवाळी अंकांकरिता तीन महिन्यांसाठी ३७५ रुपये सभासदत्व शुल्क आहे. हे शुल्क गेल्या वर्षीएवढेच ठेवण्यात आले आहे. रत्नागिरीकरांनी हे प्रदर्शन पाहावे आणि दिवाळी अंकांच्या साहित्यिक फराळाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZZGCG
Similar Posts
अशोक समेळ करणार ‘मी अश्वत्थामा’चे अभिवाचन रत्नागिरी : महाभारतकालीन व्यक्तिरेखेवर सुमारे २०-२१ वर्षे सखोल चिंतन व अभ्यास करून लिहिलेल्या ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या गाजलेल्या कादंबरीचे अभिवाचन आणि ती लिहिताना आलेले अनुभव अशोक समेळ यांच्या स्वतःच्या शब्दांत आणि त्यांच्या पत्नी संजीवनी समेळ यांच्या समवेत रत्नागिरीकरांना ऐकण्याची संधी मिळणार आहे
रत्नागिरीत बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्राचे १७ नोव्हेंबरला उद्घाटन रत्नागिरी : सव्वाशे वर्षांची परंपरा लाभलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील प्रकल्पात बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे केंद्र मोठ्या स्वरूपात काम करणार आहे. या केंद्राचे उद्घाटन १७ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी साडेतीन वाजता मारुती मंदिर
‘हॅम्लेट’च्या कलाकारांशी रत्नागिरीत गप्पागोष्टी रत्नागिरी : जिल्हा नगर वाचनालय आणि चतुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या सभागृहात तीन फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजता ‘हॅम्लेट- एक शिवधनुष्य’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात ‘हॅम्लेट’मधील कलाकारांशी मुलाखत वजा गप्पागोष्टींचा कार्यक्रम रंगणार आहे.
रत्नागिरीत रंगली ‘पाईक परंपरेचे’ ही मैफल रत्नागिरी : संगीत नाटकाच्या क्षेत्रात अजरामर कलाकृतींची देणगी देणारे नटवर्य भालचंद्र पेंढारकर, पंडित गोविंदराव पटवर्धन आणि संगीतभूषण पं. राम मराठे या दिग्गज कलाकारांच्या कलाकृती पेश करून त्यांचे वारस मुकुंद मराठे व ज्ञानेश पेंढारकर यांनी ‘पाईक परंपरेचे’ ही मैफल रत्नागिरीत रंगवली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language